मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी /पणजी
सरकारी कर्मचाऱयास सक्तीने निवृत्त करण्यापूर्वी त्यास 3 वेळा नोटीसा देण्यात येतील. त्या काळात त्याची प्रगती, कामात सुधारणा न झाल्यास नंतर त्यास निवृत्त करण्याचा आदेश बजावण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने तशी मागणी केली होती. त्यास अनुसरुन डॉ. सावंत यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. कामचुकार कर्मचाऱयांना सक्तीने निवृत्ती देण्याचा आदेश सचिवालयासह सर्व सरकारी खात्यांना लागू आहे. त्यांच्या विरोधात सक्तीने निवृत्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.









