ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याचे भाजप खा. गिरीश बापट यांचे चार दिवसांपूर्वी निधन झाले. बापट यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली आहे. वर्षभरापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.
या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसने निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. या जागेसाठी भाजपमधून एकूण पाच नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये माजी खासदार संजय काकडे, सिद्धार्थ शिरोळे, मुरलीधर मोहोळ, आ. जगदीश मुळीक यांच्यासह बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचेही नाव चर्चेत आहे. स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता अधिक आहे.
दरम्यान, काँग्रेसमधून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यामध्ये काँग्रेस कोणाला तिकीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.