बेळगाव ; बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून म. ए. समितीचा उमेदवार कोण? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड समितीने मतदान घेऊन आर. एम. चौगुले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उत्साहाचे वातावरण पसरले असून एकजुटीने त्यांना विजयी करण्याचा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे. मराठा मंदिर येथे निवड समितीची बैठक झाली. त्यामध्ये मतदान झाले. त्यामधून त्यांची निवड करण्यात आली. म. ए. समितीकडून निवडणूक लढविण्यासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर या पाचही उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली होती. माजी महापौर शिवाजी सुंठकर, रामचंद्र मोदगेकर, आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील आणि अॅड. सुधीर चव्हाण यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवारी निवड समितीच्या सदस्यांनी मतदानाद्वारे उमेदवार निवड करण्याचे ठरविले. त्यानुसार सर्वात मते जास्त आर. एम. चौगुले यांनी घेतली. त्यामुळे निवड समितीने ग्रामीण मतदारसंघाचा उमेदवार म्हणून त्यांची निवड केली आहे. निवड झाल्यानंतर साऱ्यांनीच त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर एकजुटीने त्यांना विजयी करून विधानसभेत पाठविण्याचा निर्धार केला आहे. या निवडीनंतर त्यांनी तरुण भारत कार्यालयाला भेट दिली.
Previous Articleपरवानगीशिवाय पैशांची वाहतूक, 5 कोटी जप्त
Next Article ‘दक्षिण’साठी उमेदवारांच्या मुलाखती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.