महाशिवरात्रीला भगवान शंकराची आराधना करत उपवास केला जातो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. मग यादिवशी उपवासाचे अनेक पदार्थ केले जातात.पण आज आपण एका वेगळ्या उपवासाच्या पदार्थाची रेसिपी पाहणार आहोत.जी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा.आज आपण उपवासाची चविष्ट बटाटा पुरी कशी बनवतात हे जाणून घेऊयात.
साहित्य
उकडलेले बटाटे – ४ बटाटे
वरई पिठ – १ वाटी
मिरची पेस्ट – २ चमचे
तिखट – १ चमचा
सैंधव मीठ
कोथिंबीर
पाणी
तेल
कृती
सर्वप्रथम उकडलेले चार बटाटे किसून घ्या. त्यामध्ये एक वाटी वरईचे पीठ,२ चमचे मिरची पेस्ट,एक चमचा तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार सैंधव मीठ घालून सर्व पीठ एकजीव करून घ्या. आता या पिठामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालून पीठ थोडं घट्ट मळून घ्या.आणि १५ मिनिटे बाजूला ठेवा. यानंतर पळपोटावर प्लास्टिक कागद ठेवून त्यावर सर्व पुऱ्या थापून घ्या.तेल गरम झाल्यावर पुरी तळून घ्या. गरमागरम आणि खमंग बटाटा पुरी दह्यासोबत सर्व्ह करा.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









