वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या फुटबॉल हंगामासाठी फिफाच्या सर्वोत्तम पुरुष आणि महिला फुटबॉलपटूंच्या पुरस्कारासाठी विविध फुटबॉलपटूंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पुरुषांच्या विभागात व्हिनिसीयस ज्युनियर, डॅनी कार्व्हेजेल, ज्युडे बेटिंगहॅम, एम्बापे, फिडे, व्हॅलेव्हेर्ड, टोनी क्रूस तर महिलांच्या विभागात बार्सिलोनाच्या अॅटेना बोनामतीच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अर्जेटिनाच्या लायोनेल मेस्सीने फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळविला होता. आता 2024 च्या या पुरस्कारासाठी मेस्सीचाही या शर्यतीमध्ये समावेश आहे. फिफाच्या सर्वोत्तम पुरुष विभागातील फुटबॉलपटूंची निवड करणाऱ्या समितीने पोर्तुगालच्या ख्रिस्टियानो रोनाल्डोला वगळले आहे. रोनाल्डोने अलिकडेच फुटबॉल क्षेत्रातील सर्वाधिक म्हणजे 900 गोलांचा टप्पा ओलांडला होता.









