अनेक फुटबॉलपटूंना कार्यशाळेचा लाभ
बेळगाव : पोतदार इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने आंतरराष्ट्रीय टॉप टेन फुटबॉल फ्रीस्टाईलपटू जेमी नाईट यानी खेळांडूसाठी कार्यशाळा घेऊन योग्य ते मार्गदर्शन केले. जगातील नामवंत टॉप टेन फ्रीस्टाईलपटू जेमी नाईट यांनी गिनीजबुकमध्ये आपला विक्रम नेंदविला आहे. त्यांनी बेळगावला प्रथमच भेट दिली असून एक अनुभवी व सर्वाधिक मागणी असलेल्या व्यावसायीक फुटबॉलपटू फ्रिस्टाईलपैकी जेमी एक आहे. पोतदार एज्युकेशन नेटर्वकच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून त्यांच्या दुसऱ्या भारत भेटीमध्ये खेळावर जास्त लक्ष केंद्रीत करणे व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात खेळाडू व प्रशिक्षकाकडून उत्कृष्ट कार्यशाळा व प्रशिक्षण सत्रे मिळविण्यात सक्षम बनविणे हा त्यांचा हातखंडा आहे. जेमी फुटबॉलवरील त्यांचा जबरदस्त नियंत्रणासाठी ओळखला जातो. त्याने जगभरात प्रवास केला आहे. प्रसिध्द जागतिक ब्रँड्सही संयोग केला आहे.
2017-18 या कालावधीत बॅक टू बॅक युईएफए चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत खेळपटीवर उत्कृष्ट कामगिरी केली. सातत्य आणि सुक्ष्म अंमलबजावणीमुळे त्याला जगप्रसिध्द फुटबॉलपटूंकडून तसेच चाहत्याकडून खूप प्रेम मिळाले. जेमीचा ठाम विश्वास आहे की, फ्री स्टाईल फुटबॉल शारीरीक व मानसिक आरोग्य विकसित करण्यात मदत करते आणि वाढीच्या मानसिकतेची महत्व शिकवते. यावेळी पोतदार एज्युकेशन नेटवर्कच्या सर्वांगीण शिक्षणाला भक्कम पाठींबा मिळतो. पोतदार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल इतका उत्साह, प्रतिभा आणि आवड आहे. ते पाहून त्यांना आनंद झाला. भारत फुटबॉल खेळात जागतिक ताकद बनू शकतो. कदाचित विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत लवकरच सहभागी होईल अशी आशा बाळगतो. यावेळी पोतदार स्कूलचे प्राचार्य राज होलमनी, संचालक हर्ष पोतदार व शिक्षक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









