वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू जो थॉमसन याचे शुक्रवारी वयाच्या 36 व्या वर्षी ब्लड कॅन्सरने (रक्त कर्करोगाने) निधन झाले. गेल्या वर्षापासून तो कर्करोगाशी कडवी लढत देत होता.
थॉमसनने पाच वर्षांपूर्वीच व्यवसायिक फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. प्रिमीयर लीग फुटबॉल स्पर्धेत तो रॉचडेली क्लबचे प्रतिनिधीत्व करीत होता. तो आपल्या वयाच्या नवव्या वर्षी मॅचेंस्टर युनायटेड अकादमीमध्ये दाखल झाला आणि त्याने आपल्या फुटबॉल कारकिर्दीला प्रारंभही केला होता. इंग्लीश फुटबॉल फेडरेशन तसेच मॅचेंस्टर युनायटेड अकादमीतर्फे त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.









