वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या 16 वर्षाखालील वयोगटाच्या सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेसाठी चालू महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारतीय फुटबॉल संघासाठी राष्ट्रीय प्रशिक्षण सराव शिबिर श्रीनगरमध्ये घेतले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली.
श्रीनगरमध्ये यापूर्वी संतोष करंडक फुटबॉल स्पर्धा तसेच आय लिग फुटबॉल स्पर्धेतील सामने यशस्वीपणे भरवले गेले होते. आता भारतीय कनिष्ठ फुटबॉल संघासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय सराव शिबिराकरीता श्रीनगर शहराची निवड करण्यात आली आहे. या शिबिरामध्ये संभाव्य 52 फुटबॉलपटू सहभागी होत आहेत.