क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
गोवा वेटरन्स फुटबॉल क्लबने आयोजित केलेल्या 40 व 50 वर्षावरील फुटबॉल स्पर्धेत अनुक्रमे साई वेटरन्स व वेर्णा वेटरन्स संघाने विजेतेपद पटकावले. सिंकेटी मैदानावर ही स्पर्धा खेळविण्यात आली.
40 वर्षावरील अंतिम सामन्यात साई वेटरन्सने वेर्णा वेटरन्सवर सडन डेथमध्ये 7-6 गोलने विजय मिळवला. पुर्ण वेळाच्या खेळात दोन्ही संघ 1-1 गोलने बरोबरीत राहिल्याने टाय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. साई वेटरन्सतर्फे अजय दीवाडकरने गोल करून आघाडी मिळवून दिली होती. वेर्णा वेटरन्सतर्फे मारीयानो रिबेलोने गोल करून बरोबरी साधली. टाय ब्रेकरमध्येही दोन्ही संघ 4-4 गोलने बरोबरीत राहिले.
50 वर्षावरील स्पर्धेत वेर्णा वेटरन्सने बार्देश वेटरन्सवर 1 गोलने विजय मिळवला. मार्पुस कारव्हालोने हा विजयी गोल केला. पारितोषिक वितरण समारंभाला तुये एफसीचे अध्यक्ष डॉ. कायताने फर्नाडीस, नावेली सरपंच पॉल पेरेरा, तळावली सरपंच लॅना कुतिन्हो व जीव्हीएफसीचे अध्यक्ष आवेर्तानो फुर्तादो हे उपस्थित होते. त्यांच्याहस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.









