कुडाळ : प्रतिनिधी
ठाकरे शिवसेनेकडून निषेध व्यक्त
भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विषयी कथित आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात बुधवारी कुडाळ येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षच्या महिला आघाडीच्या वतीने जोडो मारो आंदोलन करण्यात आले. महिला पदाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्यां विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि ती प्रतिमा पायदळी तुडवली. तसेच त्यांचा निषेध केला.
कुडाळ शिवसेना ( ठाकरे गट) शाखा कार्यालयासमोर शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी किरीट सोमय्यां विरोधात आज दुपारी आंदोलन केले. सोमय्या यांच्या या कृत्या बाबत संताप व्यक्त केला. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला आघाडी जिल्हा संघटक जान्हवी सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, महिला आघाडी तालुका संघटक स्नेहा दळवी, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे ,ज्योती जळवी व श्रृती वर्दम, विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, दिपक आंगणे, पावशी सरपंच वैशाली पावसकर, तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, पिगुळी माजी सरपंच निर्मला पालकर-मोर्ये, युवती सेनेच्या काजल सावंत, ओबीसी सेल शहरप्रमुख राजू गवंडे, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, आंबडपाल उपसरपंच गोट्या चव्हाण, बंड्या कोरगावकर, संचिता फडके आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.









