Mental Health Day 2022 : खाण्या-पिण्याचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो.जर आपण अन्न योग्य पध्दतीने खाल्ले नाही तर आपल्या शरीरात अनेक बदल दिसू लागतात. बदलासोबतच अनेक आजारही आपल्या शरीरात जन्म घेतात.पण तुम्हाला माहित आहे का की अन्नाचा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.असे अनेक खाद्य पदार्थ आहेत जे मानसिक आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाहीत. असे कोणते खाद्य पदार्थ आहेत ज्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवर होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. मानसिक आरोग्याची समस्या ही आजच्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. जर तुम्हाला मानसिक आरोग्य राखायचे असेल तर काही खाद्यपदार्थ तुमच्या आहारातून आजच वगळा.
तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ खाण्याचे बरेचजण शौकिन असतात. पण ते आरोग्यासाठी तितकेच हानिकारक असतात.त्यामध्ये सोडियम आणि चरबीचे प्रमाण खूप जास्त असते ज्यामुळे आपला मूड बदलू शकतो आणि चिडचिड होऊ शकते. तळलेले पदार्थ तुमच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम करतात म्हणून हे खाणे टाळा.
एनर्जी ड्रिंक्स
एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने शरीरात झोप आणि चिंता निर्माण होते ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडू शकते.एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफीन,साखर आणि कृत्रिम स्वीटनरचे प्रमाण जास्त असते.एनर्जी ड्रिंक्स टाळणे चांगले आहे कारण ते तुमच्या शरीराला खूप हानी पोहोचवू शकतात.
साखर मुक्त उत्पादने
प्रक्रिया केलेली साखर आपल्यासाठी किती वाईट आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणून लोक हलकी किंवा साखर मुक्त उत्पादने पसंत करतात. पण ही शुगर फ्री उत्पादने आपल्या मानसिक आरोग्यासाठी अजिबात चांगली नाहीत.
सोडा
सोडा शरीराला हाणीकारक आहे. त्यात असलेली साखर आपला रक्तदाब वाढवते ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य बिघडू शकते.त्यामुळे मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते पिणे टाळावे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









