दरवषी 19 एप्रिल रोजी जागतिक यकृत दिन साजरा केला जातो. आधुनिक जगात लोकांच्या खाण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. त्यामुळे त्याचे शरीरावर विपरित परिणाम होत आहेत. पचन, शुद्धीकरण, चयापचय, रोगप्रतिकार नियमनासह विविध 500 शारीरिक कामे करणाऱ्या यकृताचे आरोग्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यानिमित्त यंदा विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ‘अन्न हेच औषध’ असा यंदाचा विषय आहे. विविध आजारांमुळे यकृतावर परिणाम होतात. हे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. व्हायरल हिपॅटायटीस या आजारात ए, बी, सी, डी आणि ई असे प्रकार आहेत. यामुळे कावीळ होऊ शकते. अन्न आणि पाण्यातून झालेल्या विषबाधेमुळे हिपॅटायटीस ए व ई चा फैलाव होतो. यामुळे ताप, भूक मंदावणे, उलटी असा त्रास संभवतो आणि कावीळ होते. काही आठवड्यांच्या औषधोपचारानंतर हा आजार बरा होतो.
हिपॅटायटीस ए आजार झालेल्यांच्या संख्येत वाढ
बेळगावसह परिसरात हिपॅटायटीस ए आजार झालेल्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. या विषाणूमध्ये आता बदल झाले आहेत. आपल्यापैकी बहुतेकांनी हिपॅटायटीसचे इंजेक्शन घेतलेले नाही. पण, तसे असले तरी हा आजार बरा होतो. यकृत दुबळे असेल तर त्यासाठी योग्य खबरदारी घ्यावी लागते. पाणी उकळून पिणे, ताजे अन्न खाणे, वेळीच औषधोपचार घेतल्याने आजारावर नियंत्रण येते. हिपॅटायटीस ई आजारावरही औषधोपचाराने नियंत्रण मिळते. गर्भवती महिलेला हा आजार झाल्यास यकृत निकामी होण्याची शक्मयता असते.
हिपॅटायटीस बी, सी आजार गंभीर
हिपॅटायटीस बी आणि सी हे आजार गंभीर असतात. रक्तामध्ये ते पसरतात. संसर्ग झालेले रक्त इतर व्यक्तीला चढवल्यास तिलाही हा आजार होतो. शरीरसंबंध, प्रसूतीवेळी आईकडून मुलाला हा आजार होतो. त्याचे यकृतावर गंभीर परिणात होतात. यकृत निकामी होते, पॅन्सरचा धोका निर्माण होतो. हा आजार झाल्यास आजीवन औषधोपचार घ्यावे लागात. यावर कायमस्वऊपी उपचार अद्याप उपलब्ध नाहीत. हिपॅटायटीस सी आजाराचे लवकर निदान झाले तर प्रभावी औषधे देऊन त्यावर मात करता येते. केएलई ऊग्णालयाच्या गॅस्ट्रोएण्टोरॉलॉजी विभागाकडून याबाबत नियमितपणे जागृती करण्यात येत आहे.
पॅटी लिव्हर
पॅटी लिव्हर आजाराला मेटाबॉलिक डीसफन्क्शन असोसिएटेड स्टीटोटिक लिव्हर डिसीज असेही म्हटले जाते. अतिरिक्त चरबीमुळे यकृताचा गंभीर आजार होऊ शकतो. यकृत निकामीही होऊ शकते. स्थूलपणा आणि मधुमेहाचा परिणामही त्यावर होतो. सध्या मधुमेह ऊग्णांची राजधानी म्हणून भारताचा उल्लेख केला जात आहे. आता अशा ऊग्णांमध्ये यकृत आजार दिसून येणे सामान्य बनले आहे. यामागे सध्याची बदललेली जीवनशैली हे मुख्य कारण आहे. तासन्तास काम करणे, व्यायामाचा अभाव, प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा अधिक वापर अशा विविध कारणांमुळे यकृताचे आजाराचे ऊग्ण वाढत आहेत.
केएलईचे सर्वेक्षण
डॉ. संतोष हजारे यांच्या नेतृत्वाखाली केएलईच्या गॅस्ट्रोएण्टोरॉलॉजी विभागाने बेळगाव परिसरात केलेल्या सर्वेक्षणात 35 ते 40 टक्के प्रौढांमध्ये पॅटी लिव्हर आणि त्यापैकी 20 ऊग्णांमध्ये धोक्मयाची पातळी गाठल्याचे दिसून आले आहे. 15 ते 20 टक्के कुमारवयीनांमध्ये हा आजार दिसून आला आहे. त्यामुळे युवावर्गाला त्यांची जीवनशैली बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
वेळीच निदान झाल्यास आजारापासून मुक्त
पॅटी लिव्हरच्या आजाराच्या बाबतीत एक चांगली बातमीही आहे. वेळीच याचे निदान झाले तर या आजारातून पूर्णपणे बरे होता येते. 7 ते 10 टक्के वजन कमी करणे, रोजचा आहार समतोल राखणे, शारीरिक हालचाली वाढवणे यामुळे यकृताचे काम योग्यरित्या होऊ शकते. सुऊवातीच्या काळात या आजाराची कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. पण आज अत्याधुनिक औषधांमुळे सुऊवातीच्या काळातील आजारावर मात करणे शक्मय होते. नियमित चाचणी केल्यास यकृत आजाराचे निदान करणे शक्मय होते.
अल्कोहोलिक लिव्हर डिसीज
मद्यपींमध्ये हा आजार दिसून येतो. अलिकडे युवावर्ग याची शिकार होत आहे. नुकताच कामाला लागलेला युवक कुटुंबाचा आधार बनलेला असतो. त्याला मद्याचे व्यसन असेल तर त्याचे विपरीत परिणाम त्याच्या आरोग्यावर होतात. त्याच्या यकृतावर थेट परिणाम होऊन गंभीर आजार संभवतो. यकृत निकामी झाल्यास कुटुंबीयांवर उपचाराचा आर्थिक बोजा पडतो. शहर आणि ग्रामीण भागात व्यसनमुक्ती केंद्रांचा अभाव आहे.
काविळीवर गावठी उपचार
ग्रामीण भागात काविळीवर गावठी उपचार केले जातात. परंतु झाडपाल्याची औषधे तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यायला हवीत. शिवाय ती वैद्यकीय शास्त्रानुसार योग्य आणि सुरक्षित आहेत का? हे तपासायला हवे. नाही तर शरीरासाठी ती धोकादायक ठरू शकतात. आजार फोफावत गेल्यानंतर ऊग्णाला ऊग्णालयात दाखल केले जाते. तोपर्यंत यकृत आजाराची पातळी धोकादायक वळणावर असते. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केएलईच्या गॅस्ट्रोएण्टोरॉलॉजी विभागाने यकृत उपचाराबाबत राष्ट्रीय पातळीवरील प्रभावी उपचारपद्धती उपलब्ध केली आहे. सर्व प्रकारच्या यकृत आजारांवर उपचार उपलब्ध करण्यात आले आहेत. केएलई ऊग्णालयात सुसज्जीत यकृत अतिदक्षता विभाग सुरू केले आहेत. या ठिकाणी प्रशिक्षित आणि तज्ञ डॉक्टर सेवा देतात. कोणत्याही प्रकारच्या यकृताच्या तातडीच्या उपचारावेळी डॉक्टर उपलब्ध होतात. यकृत प्रत्यारोपणासाठी विशेष विभाग सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षांत या विभागाने 18 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.
रोजच्या जेवणामध्ये काय असावे, काय नाही याचा अभ्यास करण्याची गरज
यंदाचा यकृत दिनाचा विषय ‘अन्न हे औषध’ असा आहे. आपल्या रोजच्या जेवणामध्ये काय असावे, काय नाही याचा अभ्यास करण्याची वेळ आता आली आहे. तंतूमय पदार्थ, फळे, भाज्या, कडधान्ये, विविध प्रकारच्या सुक्मया मेव्यातील आरोग्यदायक स्निग्ध पदार्थ, ओमेगा 3 जीवनसत्त्व असणारे मासे अशा प्रकारच्या अन्नामुळे यकृताचे आरोग्य ठीक राहाते. पाण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. मद्यपान, धूम्रपान, अतिरिक्त साखर, प्रक्रिया केलेले अन्न आदींमुळे यकृताच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
तीन प्रभावी पावले उचलण्याचे गॅस्ट्रोएण्टोरॉलॉजी विभागातर्फे आवाहन
यकृत दिनी केएलई ऊग्णालयाच्या गॅस्ट्रोएण्टोरॉलॉजी विभागाने सर्वांना तीन प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. आरोग्यदायी अन्न खावे, नियमित व्यायाम आणि यकृत तपासणी करून घेणे. यामुळे सुऊवातीपासूनच खबरदारी घेतली तर भविष्यात धोका निर्माण होणार नाही. शरीरातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या यकृताच्या सेवेचा आदर करून त्याची काळजी, खबरदारी, देखभाल करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
-डॉ. संतोष हजारे









