उमेदवारी दाखल करण्यासाठी 18 एप्रिल शेवटचा दिवस
फोंडा : फोंडा नगरपालिकेच्या एकूण 15 प्रभागांसाठी 5 मे रोजी मतदान होणार आहे. आज सोमवार 10 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तिस्क फोंडा येथील मामलेदार कार्यालयात सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. 18 एप्रिल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. फोंडा पालिकेचे एकूण 15 प्रभाग आहेत. त्यामध्ये प्रभाग 3, 8, 11, 15 हे महिलांसाठी राखीव असून प्रभाग नं. 5 व 10 (महिला, ओबीसीं) राखीव करण्यात आलेला आहे. इतर प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. पालिका क्षेत्रात एकूण 15 प्रभागात 16305 मतदार आहेत. यापैकी 8152 पुरूष तर 8153 महिला मतदार आहेत. बहुतेक प्रभागात माजी नगरसेवक इच्छूक असून काहींचा राखीवतेमुळे पत्ता कट झालेला आहे. नगराध्यक्ष रितेश रवी नाईक, विश्वनाथ दळवी, गीताली तळावलीकर आदी आपली उमेदवारी दाखल करण्याचे निश्चित आहे. फोंडा नगरपालिका क्षेत्रात उमेदवारी अर्ज सोमवार 10 एप्रिल ते 18 एप्रिल पर्यत दाखल करण्यात येईल. 19 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल. त्यानंतर 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून मतदान 5 मे रोजी सकाळी 8 ते सायं. 5 पर्यंत चालणार आहे. 7 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे









