रंग खेळून होळी साजरी करण्याची भारतीय परंपरा आहे. या दिवशी प्रत्येक जण रंग उडवून होळी साजरी करतो. होळीच्या दिवशी रंग खेळायला खूप छान वाटतं, पण रंग खेळल्यावरत्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. होळीच्या दिवशी त्वचेची आणि केसांची सर्वात वाईट अवस्था होते. पण आज आपण काही अशा टिप्स जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने तुमचे केस कलर-प्रूफ होतील.
होळी खेळण्याच्या एक दिवस आधी केसांना कंडिशनर आणि सिरम लावावे. हे तुमच्या केसांवर एक सुरक्षा स्तर तयार करेल आणि हानिकारक रंग तुमच्या केसांना जास्त नुकसान करू शकणार नाहीत.
होळी खेळण्यापूर्वी केस नीट बांधा. तुम्ही पोनीटेल बन किंवा कोणतीही वेणी बनवू शकता.
रंग खेळण्याच्या आधी केसांना तेल लावा. हा तेलकट थर तुमच्या केसांना केवळ रंगापासून वाचवणार नाही तर तुमच्या केसांचा पोतही सुरक्षित करेल. जेव्हा तुम्ही होळी खेळल्यानंतर केस धुता तेव्हा तेलासह लावलेले रंग निघून जातील आणि तुमचे नैसर्गिक केस सुरक्षित राहतील.
जर रंग खेळण्याधी एरंडाच्या तेलात एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि केस आणि मुळांना चांगला लावा. यासोबत केसांच्या टोकापर्यंत झाकून ठेवा. यामुळे तुमचे केस होळीच्या रंगांपासून वाचतील.
जर केसांना स्कार्फ, दुपट्टा किंवा कोणत्याही कपड्याने कव्हर केले तर तुमचे केस थेट रंगांच्या संपर्कात येण्यापासून वाचतील.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









