कलाश्री बंब-नारायण वधू-वर सूचक मंडळाचा मेळावा
बेळगाव : कलाश्री बंब व लक्ष्मी-नारायण वधू-वर सूचक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलाश्री बंब समूहाचे प्रमुख प्रकाश डोळेकर होते. यावेळी दोनशेहून अधिक वधू-वरांनी सहभाग घेतला होता. वाय. बी. पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच मुला-मुलींची लग्ने कशी जमवावीत, याची माहिती दिली. जागतिक विक्रम केल्याबद्दल रामनगर, कंग्राळी येथील शिरीष चव्हाण याचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर शिर्डी संस्थानचे पुजारी कृष्णा पाठक, क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये लग्न समारंभासाठीची आचारसंहिता वाचून दाखविण्यात आली. सध्या लग्नांच्या नावावर सुरू असलेला धिंगाणा बंद करून विधीप्रमाणे लग्न करण्याची सूचना करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी. के. पाटील यांनी केले. तर वाय. बी. पवार यांनी आभार मानले.









