वृत्तसंस्था/ पाटणा
2024 च्या रणजी क्रिकेट हंगामातील येथे सुरू असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर बिहारचा संघ मोठ्या पराभवाच्या छायेत आहे. या सामन्यात मुंबईकडून बिहारला फॉलोऑन मिळाला. दिवसअखेर बिहारचा संघ अद्याप 60 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे दुसऱ्या डावात 4 गडी खेळावयाचे आहेत.
या सामन्यात मुंबईन पहिल्या डावात 251 धावा जमविल्यानंतर बिहारने 6 बाद 89 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचे शेवटचे 4 गडी 11 धावांची भर घालत तंबूत परतले. मुंबईतर्फे मोहित अवस्थ् ााr सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 27 धावात 6 तर दुबेने 13 धावात 2 तसेच डायसने 1 गडी बाद केला. बिहारचा एक फलंदाज धावचीत झाला. मुंबईने पहिल्या डावात 151 धावांची आघाडी मिळविल्यानंतर त्यांनी बिहारला फॉलोऑफ देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मुंबईच्या पुन्हा भेदक गोलंदाजीसमोर बिहारची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडाली. दिवस अखेर बिहारने दुसऱ्या डावात 32 षटकात 6 बाद 91 धावांपर्यंत मजल मारली होती. बिहारच्या दुसऱ्या डावात सलामीच्या शर्मन निग्रोधने 55 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 40 धावा तर सूर्यवंशीने 12 धावा जमविल्या. बिपीन सौरभ 1 षटकार आणि 4 चौकारांसह 30 धावांवर खेळत आहे. मुंबईतर्फे शिवम दुबेने 7 धावात 4 गडी तर कोटीयान आणि मुलानी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी मुंबईचा संघ विजयाचे सोपस्कार पूर्ण करेल.
संक्षिप्त धावफलक : मुंबई प. डाव सर्व बाद 251, बिहार प. डाव 44.5 षटकात सर्व बाद 100 (आकाशराज 32, गनिक 22, सूर्यवंशी 19, अवस्थी 6-27, दुबे 2-13, डायस 1-29), बिहार दु. डाव 32 षटकात 6 बाद 91 (निग्रोध 40, सूर्यवंशी 12, बिपीन सौरभ खेळत आहे 30, दुबे 7-4, कोटीयान आणि मुलानी प्रत्येकी 1 बळी).









