इम्तियाज मुजावर / सातारा :
राज्यभरात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास असताना महाबळेश्वरचे तापमान मात्र 25 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. (temperature drops to 25 degrees Celsius) सर्वत्र धुक्याची चादर पसरली असून, पर्यटकांना महाबळेश्वरात काश्मीरचा आभास होत आहे. (Fog spreading in Mahabaleshwar)
राज्याचे मिनी काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर व परिसरात ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. हवामान बदलामुळे ढग महाबळेश्वरच्या निसर्गात एकरूप झाल्याचे विहंगम दृश्य पर्यटकांना आणि स्थानिकांना पाहायला मिळत आहे. महाबळेश्वर शहर व परिसरावर ढगांचे लोट पसरले असल्याने एक-दोन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये काश्मीरसारखा नजारा पाहायला मिळत आहे. गुलाबी थंडी आणि पांढरी शुभ्र धुक्याची चादर पसरल्याने पर्यटकांना महाबळेश्वरात काश्मीरसारखा आभास होत आहे.