Weather Update In Kolhapur : ऐन उन्हाळ्यात कोल्हापुरात धुक्याची चादर आज कोल्हापुरकरांना अनुभवली.उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी आज थंडीचा अनुभव घेतला.पहाटे ते सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे धुके पसरले होते. मॉर्निग वॉकला जाणाऱ्य़ा नागरीकांनी गुलाबी थंडी अनुभवली. गेले काही दिवस कडक ऊन्हाने त्रस झालेल्या कोल्हापुरकरांना हा अनुभव सुखद होता.

मात्र, या धुक्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होऊ शकतो. जी पिके दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत त्या पिकांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यात ज्वारीची काढणी सुरू आहे. भरलेल्या कणसावर जर या धुक्याचे दव जादा काळ पडून राहिले तर कणसे काळी पडू शकतात.याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो.









