भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर : पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची टीम सज्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवार, 29 जुलै रोजी आपली नवी टीम जाहीर केली. नड्डा यांच्या नव्या टीममध्ये नव्या-जुन्या चेहऱ्यांचा ताळमेळ बसवण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबरोबरच चालू वर्षात विधानसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांवर विशेष फोकस दिल्याचे दिसून येत आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातून विनोद तावडे, विजया रहाटकर यांच्यासह गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांचीही कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करताना अनेक समीकरणे सांभाळली आहेत. न•ा यांच्या नव्या टीममध्ये 38 नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, आठ राष्ट्रीय महासचिव, एक राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना), एक राष्ट्रीय सह-संघटन महासचिव, एक कोषाध्यक्ष, एक सहकोषाध्यक्ष आणि 13 राष्ट्रीय सचिवांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशातील दोन खासदार रेखा वर्मा, लक्ष्मीकांत वाजपेयी आणि विधान परिषदेचे सदस्य आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू तारिक मन्सूर यांना केंद्रीय उपाध्यक्षांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही केंद्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे.
प्रमुख चेहरे समाविष्ट
भाजपने जाहीर केलेल्या यादीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुबर दास आणि मध्य प्रदेशातून आलेल्या सौदान सिंह यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय कैलाश विजयवर्गीय, अऊण सिंह आणि तऊण चुग यांना सरचिटणीस करण्यात आले आहे. यासोबतच बी.एल.संतोष यांची राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन), शिव प्रकाश (लखनौ) यांची राष्ट्रीय सह-संघटन सरचिटणीसपदी, राजेश अग्रवाल (उत्तर प्रदेश) यांची खजिनदारपदी आणि नरेश बन्सल (उत्तराखंड) यांची सहकोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातून तिघांना संधी
लोकसभेच्या 48 जागा असलेल्या महाराष्ट्रातून विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर विजया रहाटकर यांनाही संधी देण्यात आली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव असतील. पंकजा काही काळ पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. अलीकडेच त्यांनी दोन महिने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.
आगामी रणनीतीही निश्चित
भाजप अध्यक्ष जेपी न•ा यांनी शुक्रवारी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक घेतली. सुमारे चार तास चाललेल्या या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुका, एनडीएची बैठक, मतदारांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आणि पाच राज्यांतील निवडणूक लढती या मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये संघटनात्मक विस्तार आणि पक्षाचे सुरू असलेले कार्यक्रम गतिमान करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीला राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष, राष्ट्रीय संयुक्त संघटन सचिव व्ही. सतीश यांच्यासह महासचिव अऊण सिंग, सुनील बन्सल आदी उपस्थित होते. बैठकीनंतर शनिवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या नव्या टीमची घोषणा करण्यात आली.
अँटोनींचे पुत्र राष्ट्रीय सचिव
संजय बंदी आणि सुनील बन्सल यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले आहे. संजय बंदी यांचा केंद्रीय संघात समावेश करून पक्षाने तेलंगणाला संदेश दिला आहे. कैलाश विजयवर्गीय, तऊण चुग, विनोद तावडे, अऊण सिंग यांना पुन्हा संधी मिळाली आहे. सर्वांना पुन्हा सरचिटणीस बनवण्यात आले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते ए. के. अँटोनी यांचे पुत्र अऊण अँटोनी यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अँटोनी यांनी काही काळापूर्वी पक्षात प्रवेश केला होता. गोरखपूरचे माजी आमदार राधामोहन अग्रवाल यांना केंद्रीय संघात एंट्री देऊन उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठा संदेश गेला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आले नव्हते, मात्र आता त्यांना राष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले आहे. आंध्रप्रदेशचे प्रभारी सुनील देवधर यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले. सीटी रवी आणि दिलीप सैकिया यांनाही सरचिटणीस पदावरून हटवण्यात आले आहे. मध्य प्रदेशचे खासदार आणि माजी सहकोषाध्यक्ष यांना हटवण्यात आले. त्यांच्या जागी नरेश बन्सल यांना सहकोषाध्यक्ष करण्यात आले आहे.
केंद्रीय उपाध्यक्ष
रमण सिंग – छत्तीसगड
वसुंधरा राजे – राजस्थान
रघुवर दास – झारखंड
सौदान सिंग – मध्यप्रदेश
वैजयंत पांडा – ओडिशा
सरोज पांडे – छत्तीसगड
रेखा वर्मा – उत्तर प्रदेश
डी. के. अऊण – तेलंगणा
एम चौबा एओ- नागालँड
अब्दुल्ला कुट्टी – केरळ
लक्ष्मीकांत वाजपेयी – उत्तर प्रदेश
लता उसेंडी – छत्तीसगड
तारिक मन्सूर – उत्तर प्रदेश
राष्ट्रीय सरचिटणीस
अऊण सिंग – उत्तर प्रदेश
कैलाश विजयवर्गी – मध्यप्रदेश
दुष्यंतकुमार गौतम – दिल्ली
तऊण चुग – पंजाब
विनोद तावडे – महाराष्ट्र
सुनील बन्सल – राजस्थान
संजय बंदी – तेलंगणा
राधामोहन अग्रवाल – उत्तर प्रदेश









