पावसामुळे तिसऱया रेल्वेगेट उड्डाणपुलावरील डांबरीकरणाचे काम रखडले : पूल खुला होण्यास आणखी किती कालावधी लागणार?
प्रतिनिधी / बेळगाव
तिसऱया रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण करून खुले करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पथदीप बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र पावसामुळे उड्डाणपुलावरील डांबरीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे उड्डाणपूल खुला होण्यास आणखी किती कालावधी लागणार, अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
तिसऱया रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, कोरोनामुळे रखडलेल्या उड्डाणपुलाच्या पूर्ततेसाठी आणखी किती कालावधी लागणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. रॅम्प बनविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर फुटपाथ व डांबरीकरणाचे काम पूर्ण करून रंगरंगोटी केल्यानंतर उड्डाणपूल खुला करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र सदर कामे संथगतीने सुरू असल्याने उड्डाणपुलाचा रस्ता खुला करण्याचे काम लांबणीवर पडले आहे. फुटपाथ आणि पथदीप बसविण्याचे काम सुरू आहे.

आणखी 4 महिने लागण्याची शक्मयता
पावसामुळे डांबरीकरणाचे काम रखडले असून रंगरंगोटीचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे कामे पूर्ण होण्यास आणखीन चार महिने लागण्याची शक्मयता आहे. तिसऱया रेल्वेगेटजवळ वाहतूक कोंडी होत असून, वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे उड्डाणपुलाशेजारील रस्ता अरुंद असून याठिकाणी मातीचे ढिगारे तसेच विविध साहित्य ठेवण्यात आले असल्याने येथील व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उड्डाणपूल कधी खुला होणार, अशी विचारणा होत आहे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने उड्डाणपूल उभारणीस विलंब होत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या आणि स्थानिक व्यावसायिकांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.









