प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Crime News : वार्षिक परिक्षा संपल्यानंतर मे महिन्याची सुट्टी आणि वर्षा पर्यटन हे समिकरण आहे. लहान मुलांनासह सर्वांनाच सुट्टीचे आकर्षण असते. परिक्षा संपल्यानंतर ट्रीपमध्ये धम्माल करण्याचे नियोजन अनेक कुटूंब करत असतात. मात्र याचसोबत सुट्टीला गावी किंवा पर्यटनाला जात असताना सावधानता बाळगणेही तितकेच गरजेचे आहे. चोरट्यांच्या टोळ्या सध्या अॅक्टीव्ह झाल्या आहेत. पोलिसांच्या गस्तीसोबतच नागरिकांनीही थोडी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
एप्रिल मे महिन्यात परीक्षा संपल्यानंतर पडणाऱ्या सुट्टीमध्ये पर्यटनाचे नियोजन बहुतांशी कुटुंब करत असतात. सहकुटुंब सहपरिवार ही ट्रीप केल्यामुळे घराला सर्रास कुलूप असते. याचाच फायदा घेऊन बऱ्याचवेळा दिवाळी व मे महिन्याच्या सुट्यांमध्ये घरफोड्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. मार्च, एप्रिलमध्ये असणारे सण आणी लग्नसराई यासाठी बहुतांशी नागरीक लॉकरमध्ये असलेले दागिने घरी आणून ठेवतात. किंवा ज्यादा प्रमाणात रोकडही घरी ठेवतात. मात्र सहलीवर जाण्यापूर्वी दागिने लॉकरमध्ये ठेवण्यास टाळाटाळ करतात. याचाच फायदा चोरटे घेत असतात. सुट्टीवरून आल्यानंतर आपल्या घरातील दागिने, पॅश यासह टीव्ही, लॅपटॉप चोरल्याचे नागरिकांच्या लक्षात येते. आणि त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते. यामुळे ट्रीपवर जाताना नागरीकांनीही काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. पोलिसांसोबतच आपल्या वस्तुंची जबाबदारी आपलीच आहे हे नागरीकांनी लक्षात घेऊन थोडीशी खबरदारी घेतल्यास चोरीच्या घटनेला आळा बसू शकतो.
एप्रिल, मे अखेर घरफोडी आकडेवारी
दाखल उघड
घरफोडी 324 85
चेन स्नॅचिंग 20 14
शहरासह उपनगरातही रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त सध्या वाढवली आहे. स्थानिक पोलिसांसोबतच मुख्यालयातील बंदोबस्त मदतीला घेण्यात आला आहे. स्थानिक पोलीस स्टेशनमधील बीट अंमलदारांना सूचना करण्यात आल्या आहेत. पोलिसांबरोबरच नागरीकांनीही खबरदारी घ्यावी. संशयास्पद काही हालचाली दिसल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्याशी किंवा 112 नंबरशी संपर्क करावा.
महादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण
काय खबरदारी घ्याल
घराबाहेर सीसीटीव्ही लावणे, त्याचा कंट्रोल मोबाईलवर ठेवणे
लग्न, समारंभ किंवा सुट्टीवर जाताना मौल्यवान वस्तु, पॅश बँक किंवा लॉकरमध्ये ठेवणे.
गावी किंवा सहलीसाठी जाणार असल्याची कल्पना नातेवाईक किंवा शेजाऱ्यांना देणे.
शक्य असल्यास तात्पुरत्या स्वरूपात वॉचमॅन ठेवणे.
घराबाहेर असणाऱ्या दुचाकी, सायकल लॉक करून ठेवणे.
ट्रीपला जातानाचा किंवा गेल्यानंतरचे स्टेटस, फोटो, सोशल मिडीयावर ठेवू नये
सोसायटी, किंवा अपार्टमेंटधारकांनी वॉचमेनची व्यवस्था करणे
उपनगरे चोरट्यांची टार्गेट
शहरासह उपनगरे चोरट्यांच्या टार्गेटवर आहेत. उपनगरात वस्ती कमी असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोऱ्या घडत असल्याचे चित्र आहे. यासह मोठ्या अपार्टमेंटमधील बंद असणारे फ्लॅटही सध्या चोरटे लक्ष करत आहेत. यामुळे पोलिसांनी उपनगरासह मोठ्या अपार्टमेंटमध्ये गस्त वाढवणे आवश्यक आहे.
सोशल मिडीयावरील पोस्ट टाळा
सुट्टीसाठी पर्यटन किंवा परगावी गेल्याच्या अनेक पोस्ट नागरीक सोशल मिडीयावर टाकत असतात. याचाच फायदा अनेकवेळा चोरट्यांनी उचलल्याचे दिसत आहे. सोशल मिडीया अकाँटवर आपले नाव, पत्ता, फोन नंबर असते. यामुळे चोरट्यांचे काम सोपे होते. यामुळे अशा पोस्ट सार्वजनिक करणे टाळावे, किंवा पोस्ट टाकताना त्या रिस्ट्रीक्टेड कराव्यात.
करवीर, शाहूपुरी, राजवाडा टार्गेट
गेल्या दोन महिन्यात झालेल्या घरफोड्या, चेनस्नॅचिंगचे प्रकार करवीर, शाहूपुरी, राजवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सर्वाधिक घडले आहेत. करवीरमध्ये पाचगांव, कळंबा, आर. के, नगर, मोरेवाडी तर जुना राजावाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये साळोखेनगर, सानेगुरुजी, आयटीआयच्या पिछाडीस अशा ठिकाणी घटना घडल्या आहेत. शाहूपुरी परिसरात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तर चोरट्यांचा सर्रास धुमाकूळ सुरु आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









