चंदगड, गडहिंग्लज, बेळगाव परिसरातील पर्यटकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे किटवाडच्या धबधब्याला मोठय़ा प्रमाणात पाणी आले असून हा धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा किटवाडकडे वाढला आहे. जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जिगझॅगवरून पाणी प्रवाहित होऊन मुख्य धबधब्यातून मोठय़ा प्रमाणात खाली पडत होते. त्यामुळे विहंगम दृश्य दिसत होते. चंदगड, गडहिंग्लज, बेळगाव परिसरातील पर्यटकांनी हा धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली होती.









