Flower Bhaji : नियमित भाजी काय बनवावी असा प्रश्न अनेकांना पडतो. याचबरोबर खूप भूक लागलीय अशावेळी चटपटीत आणि पटकन तयार होणारा पदार्थ काय करावा असाही प्रश्न पडतोच. बरेचदा आपण पिठलं, डाळ, कांदा,अंड्याची बुर्जी किंवा पोळी असे पर्याय निवडतो. पण आज आम्ही तुम्हाला अगदी पटकन होणारी फ्लॉवरच्या भाजीची रेसीपी सांगणार आहोत. जी खायला ही खूप चविष्ट लागते.शिवाय पटकन होते. चला तर जाणून घेऊया.
साहित्य
फ्लॉवर – अर्धा किलो
कांदे- 2
हिरवी मिरची- 4 ते 5
हळद- पाव चमचा
हिंग- पाव चमचा
जिरे-पाव चमचा
मीठ- चवीनुसार
लिंबू- अर्ध्या लिंबाचा रस
कृती
सुरवातीला फ्लॉवर कट करून स्वच्छ धुऊन घ्या.त्यानंतर कांदे लांब कट करून घ्या. कांद्यात मीठ, हळद घालून मिक्स करा. आता कढईत तेल टाकून कांदा तळून घ्या. यानंतर फ्लॉवर तळून घ्या. आता पुन्हा दुसऱ्या कढईत थोडे तेल घाला. तेल चांगले तापले की त्यात जिरे टाका,त्यानंतर कट केलेली हिरवी मिरची, हळद, हिंग घाला. यानंतर त्यात अर्धा लिंबू पिळून चवीनुसार मीठ घाला. आता फ्लॉवर टाका.5 मिनिट फ्राय करून घ्य़ा. सर्व्ह करताना तळलेला कांदा घाला.









