कोल्हापूर :
शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकार लवकरच प्लास्टिक फुलांवर बंदीचा निर्णय घेणार आहे. याचा फायदा आता शेतकऱ्यांना होणार आहे. कारण बाजारपेठेत नैसर्गीक फुलांची मागणी सणासुदीला वाढणार आहे. त्यामूळे जिह्यातील या शेतील सुगीचे दिवस येणार आहेत.
कोल्हापूर जिल्हा हा पुष्पोत्पादन/फुलोत्पादन शेतीमध्ये पूर्वीपासून राज्यास दिशादर्शक व अतिशय उल्लेखनीय काम करत आलेला आहे. जिह्यामध्ये पारंपारिक ते अत्याधुनिक फुत्त शेती करणारे हजारो शेतकरी आहेत, जे आपल्या शेतामध्ये विविध प्रकारची फुले उदा. गुलाब, शेवंती, झेंडू, निशिगंध, मोगरा, बाफा अशी पारंपरिक तसेच जरबेरा, जिप्सोफिला, कार्निशन, डच गुलाब या प्रकारची हरित्तगृहामधील देश-विदेशी फुल उत्पादन घेत आहेत. एकेकाळी जिल्हा हा फुलशेतीमध्ये राज्यामध्ये अग्रेसर जिल्हा म्हणून गणला जात होता.
हरितगृह शेतीचा विचार केला तर कोल्हापूर जिह्यामध्ये 2000-2015 पर्यंत 300 ते 500 हरितगृह शेतकरी होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये कृत्रिम फुलांचा भारतीय बाजारपेठेमध्ये शिरकाव झाल्यामुळे त्याचा थेट विपरित्त परिणाम सर्वप्रथम सर्वसामान्य हरितगृहमधील शेतकऱ्यांना जाणवण्यास सुरुवात झाली. त्याचा विळखा हा गेल्या 10 वर्षांमध्ये एवढा भयंकर झाला की संध्या जिह्यात फक्त 35 ते 50 शेतकरी हे हरितगृह शेतीमध्ये शिल्लक आहेत या कृत्रिम फुलांच्या अतिरिक्त वापराचा विपरीत परिणाम हा अलिकडील काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर पारंपरिक फुल शेतीवर देखील होऊ लागला आहे.
बाजारपेठे मध्ये सर्वत्र झेंडू, शेवती, मोगरा यांच्या माळा उपलब्ध आहेत, ऐन सणासुदीला देखील फुलांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही, त्यामुळे फुलशेतीमधील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. फुलशेतीचे क्षेत्र प्रचंड झपाट्याने कमी झाले आहे.. तसेच या कृत्रिम फुलांमध्ये वापरण्यात येणारे रंग मानवी शरीरास अत्यंत घातक असल्याचे संशोधनामध्ये आढळले आहे. पण बुधवारी 105 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच प्लॉस्टिक फुलांवर बंदी येणार आहे. याचा भविष्यात फुलांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मेठा फायदा होणार आहे.
- युरोप देशांमध्ये आहे प्लास्टिक फुलांना बंदी
प्लास्टिक फुलांना यूरोप देशांमध्ये बंदी आहे. कारण याचे होणारे पर्यावरणीय तोटे फार गंभीर स्वरूपाचे असल्याचे पर्यावरण तज्ञ सांगतात. यामध्ये असणारे केमिकल हे मानवी त्वचेसाठी हानीकारक आहे. कॅन्सर सारखे गंभीर आजार देखील यामूळे होतात. असा दावा काहींनी केला आहे.
- देशात मोठी बाजारपेठ
पुर्वी चायनामधुन आयात करावी लागणारी कृत्रीम फुले ही आज भारतात सहजरित्या उपलब्ध होत आहेत. कारण चायनामध्ये ही फुले तयार करण्यासाठी असणाऱ्या मशनरी या भारतात सर्वत्र पसरल्या गेल्या आहेत. भारतामध्ये सर्वात जास्त या फुलांचे उत्पादन उत्तर भागात होते. पण आता भारतात सर्वत्र याचे कारखाने तयार झाले आहेत. डेकारेशन करणारे नैसर्गीक फुलांपेक्षा प्ला]िस्टक फुले स्वत: असल्याने ही फुले लग्नसंमारंभ आणि इतर कार्यक्रमात वापरत. त्यामूळे फुल उप्तादक शेतकऱ्यांचे अर्थकारण पार बिघडून जात होते. प्लास्टिक फुले पुर्नवापरासाठी उपयुक्त असल्याने डेकोरेशनवाल्यांची या फुलांना खुप मागणी असते. त्यामूळे एकीकडे डेकोरशन वाल्यांचा फायदा झाला पण शेतकरी तसाच कर्जबाजारी होत राहीला.
- कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल फायदा
संपुर्ण भारतात कृत्रीम फुलांची 8000 ते 10000 कोटीची बाजारपेठ आहे. त्यामूळे महाराष्ट्रसह कोल्हापूरातील शिरोळ, हातकणंगले, कागल, राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा तालूक्यात मोठया प्रमाणात शेतकरी फुलांची लागवड करतात. या शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. प्लास्टिक फुले बंदीचा निर्णय नक्कीच आम्हाला दिलासादायक आहे. शेतक्रयांचे उत्पन्न वाढेल आणि राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेस बळकटी मिळेल.
-संभाजी शिंदे, शेतकरी, कोल्हापूर








