डिचोली व साखळीत पंपींग सुरू. तिळरीच्या पाणी विसर्गने साळ नदीत किंचित पातळी वाढली. आमदारांकडून साळ येथे पाहणी.

डिचोली/प्रतिनिधी
काल शुक्रवारी दिवसभर पडलेल्या जोरदार तसेच अविश्रांत पावसामुळे डिचोली व साखळी भागात पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. परंतु जलस्रोत खात्याच्या सतर्कतेमुळे सर्वत्र पुरस्थिती नियंत्रणात होती. तिळारी धराणातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने शापोरा नदीची पातळी किंचित वाढली होती. त्यामुळे साळ गावातून वाहणारी नदी दुथडी भरून वाहत होती. आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यां?नी साळ व डिचोली येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या आठवडय़ात पावसाने कहरच केल्याने तालुक्मयातील सर्व नद्या दुथडय़ा भरून वाहत आहेत. त्यातच डोगर भागात पावसाची बरसात चालूच असल्याने नद्यांना मोठय़ा प्रमाणात पाणी आले आहे. सर्व नद्या काठोकाठ भरून वाहत आहेत. त्यामुळे काल शुक्रवारी सकाळपासून कोसळलेल्या पावसाने साखळीतील वाळवंटी नदी व डिचोलीतील नदी किनारा ओलांडून वाहत होत्या.
साखळीतील वाळवंटी नदीची पातळी दुपारी वाढली होती. नदीची पातळी 2.8 मीटर इतकी होती. तर बाजारातील नाल्याची पातळी 3 मीटरवर पोहोचली होती. त्यामुळे पंप सुरू करून बाजारातील नाल्यात साचलेले पाणी नदीत फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. बंदिरवाडा विठ्ठलापूर येथे नदीकिनारी असलेल्या टोणयेश्वर पेडाला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. संध्याकाळी मात्र नदीची पातळी काही प्रमाणात घटल्याने परिस्थिती काहिशी नियंत्रणात आली होती.
डिचोली शहरातील रस्त्यावर पुराचे पाणी
डिचोली शहरातून वाहणाऱया नदीतील पाण्याने संध्याकाळी 4 मीटरच्या वर पातळी गाठली होती. त्यामुळे नदीकिनारी आसपासच्या भागांमध्ये पाणी भरले होते. शांतादुर्गा हायस्कुलसमोरील नाल्यात पाणी साचून राहिले होते. डिचोली बसस्थानक ते गावकरवाडा येथे जाणाऱया रस्त्यावर बंदरवाडा येथे काही प्रमाणात पाणी वर आले होते. लोकांना त्याच पाण्यातून वाट काढावी लागत होती. तर नंतर नदीतील पाण्याची पातळी काहीशी घटल्याने रस्त्यावरील पाणी ओसरले होते. परंतु पाणी अजूनही आजूबाजूच्या परिसरात भरूनच राहिले असल्याने रात्रभर जास्त पाऊस पडल्यास पाणी पुन्हा वाढू शकते, अशी परिस्थिती आहे.
तिळारीच्या पाण्यामुळे नदीची किंचित पातळी वाढली
तिळारी महाराष्ट्र येथील धराणातील अतिरिक्त पाण्यामुळे गेल्या काही वर्षांत साळवासीयांची झोप उडवली आहे. तिळारी धराणाची एकूण पातळी 115 मीटर इतकी आहे. तर सध्या या धरणाची पातळी 107 इतकी झाली आहे. त्यामुळे या धरणातून अतिरिक्त पाणी तिळारी नदीत सोडण्याची सुचना महाराष्ट्र जलस्रोत खात्याने दिली होती. त्यानुसार काल शुक्र. दि. 8 रोजी सकाळी धरणाची चारही दारे उघडून पाणी समोरील नदीत सोडण्यात आले. त्यामुळे साळ गावातून वाहणाऱया शापोरा नदीची पातळी किंचित वाढली होती. परंतु चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याने जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता के.पी. नाईक व सहाय्यक अभियंता विनोद भंडारी यांनी सांगितले.
आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी केली पाहणी
डिचोली मतदारसंघातील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी साळ व डिचोली येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता के. पी. नाईक, सहाय्यक अभियंता विनोद भंडारी, कनि÷ अभियंता नरेश पोकळे व इतरांची उपस्थिती होती. नदीला अचानकपणे पाणी वाढल्यास लोकांना सतर्क करण्याची यंत्रणा सज्ज ठेवण्याची सुचना यावेळी आमदार डॉ. शेटय़? यांनी केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी राज्यात सुरू असलेला पाऊह आणि हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज पाहता सर्वांनीच सतर्क रहावे. असेही आवाहन आमदार डॉ. शेटय़? यांनी केले.









