कोवाड वार्ताहर
कोवाड ( ता. चंदगड) येथे रविवारी संध्याकाळी बाझार पेठेत पुराचे पाणी आले आहे. सोमवारी दिवसभर पुराचे पाणी वाढतच चाललं आहे. यामुळे व्यापारी वर्ग धास्तावला आहे.
येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा शनिवारी पहाटेच पाण्याखाली गेला आहे. बाजारपेठेतील व्यापारी वर्गात धाकधूक वाढली होती. रवीवारी पावसाचा पुन्हा जर वाढला त्यामुळे दोन इंच कमी झालेले पाणी पुन्हा वाढला आहे सायंकाळी शिवाजी चौक ते जुना पुल दरम्यान त्याच बरोबर निट्टुर रस्त्यावरील दुकानातून पाठीमागच्या बाजूने पाणी शिरले आहे. नदी काठच्या काही व्यापारी बंधूनी आपल्या दुकानातील माल, इतर साहित्य सुरक्षित ठिकाणीं अन्यत्र हरविण्याचे काम चालू केल आहे.
दरम्यान कोवाड येथील बेळगांव बस स्टॉप लगत पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने कोवाड बेळगांव आणि कोवाड ढोलगरवाडी रस्त्यावरील वाहतूक करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्यातूनच दुचाकी, खाजगी चार चाकी वाहने वाहनचालक बिन्धास्त घालत आहेत. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज जनतेतून व्यक्त होत आहे.









