प्रतिनिधी/चिकोडी: आज (ता.5) सकाळी चिकोडी उपविभागात मदतकार्यासाठी दाखल झालेल्या एनडीआरएफ पथकासोबत प्रांताधिकारी माधव गीत्ते यांनी प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभाभवनात सभा घेवून संभाव्य पूरस्थिती व घ्यावयाची खबरदारी याबाबत चर्चा केली. तसेच संभाव्य पूरग्रस्त भागांना भेट दिली.

प्रांताधिकाऱ्यांनी संभाव्य पूरग्रस्त कागवाड व चिकोडी तालुक्यातील विविध अतिसंवेदनशील व उच्च जोखमीच्या गावांना भेटी दिल्या. एनडीआरएफच्या 21 जवानांची तुकडी चिकोडी पविभागात दाखल झाली आहे. गेल्या महिन्यातच ही तुकडी सदलगा येथील सरकारी विश्रामगृहावर वास्त्व्यास आहे. आज प्रांताधिकाऱ्यांनी या तुकडीशी बैठक घेतली. तसेच संभाव्य पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या









