हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती. तीर्थ घाटावर देवतांच्या पालख्या. मुख्यमंत्री, आमदारांनी केला अभिषेक. फेरीवाल्यांची गर्दी. नार्वे तीर्थ घाटाचा होणार विकास – मुख्यमंत्री
डिचोली : डिचोली तालुक्मयातील नार्वे या गावात पंचगंगेच्या तिर्थावर साजरी होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या जत्रेनिमित्त तीर्थ घाटावर भाविकांचा महापूरच आला होता. मोठ्या उत्साहात हि पारंपरिक व वैशिष्ट्यापूर्ण अशी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. दिवसभर विविध भागांतून आलेल्या भाविकांनी या तिर्थावर आपली सेवा रूजू केली. तसेच घाटावरील देवतांच्या पालख्यांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत: उपस्थित राहून पंचगंगेच्या तिर्थावर पूजाअर्चा करून सेवा रूजू केली. नार्वेतील तिर्थार होणारी अष्टमीची जत्रा सर्वत्र प्रसिध्द. या जत्रेत भाविकांना परिसरातील सर्व देवतांचे एकत्रित दर्शन घेण्याची संधी मिळते. त्याचप्रमाणे विविध वस्तूंची खरेदीही करायला मिळणे. याच कारणास्तव या जत्रेला दरवषी मोठ्या संख्येने लोकांची गर्दी असते. याही वषी लोकांची मोठी नार्वेत गर्दी पहायला मिळत आहे.
या नार्वे तिर्थावर पाच नद्यांचा संगम होतो. जुवारी (कुंभारजुवा कालव्यातून येते), म्हादई, खांडेपार नदी (दुधसागर), वाळवंटी व डिचोली या पंचनद्यांचा संगम होत असल्याने या तिर्थाला पवित्र मानले जाते. सकाळी विविध भागातून तिर्थाच्या घाटावर येणाऱ्या विविध देवतांच्या पालख्या आपापल्या स्थानावर येऊन विराजमान झाल्या. जत्रेनिमित्त या परिसरात मोठी फेरी भरली होती. विशेषत: नववधूला गणेश चतुर्थीत देण्यात येणाऱ्या वझ्यात आवश्यक असलेले लाकडी सामान या जत्रेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. तसेच आंब्या फणसाचे साठ, गरमागरम भट्टीत त्याचठिकाणी भाजण्यात येणारे चणे. व इतर वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती.
या जत्रेच्या उत्सवाला सकाळीपासूनच प्रारंभ झाला. तिर्थावर असलेल्या देव काळभैरवाच्या दर्शनासाठी भाविकांनी बरीच मोठी रांग लावली होती. तसेच तिर्थावर नदीकिनारी अनेक जोडप्यांनी ब्राह्मणांमार्फत पूजाअर्चा करून घेत सेवा अर्पण केली. तिर्थात फुले वाहून आपली मनोकामना प्रकट केली. घाटावर परंपरेनुसार येणाऱ्या पालख्यांमध्ये सर्वात वर काळभैरव नार्वे, सप्तकोटेश्वर नार्वे, लक्ष्मीनारायण नार्वे, विठोबा नार्वे, चांमुंडेश्वरी वरगाव, रामचंद्र गिमोणे, शांतादुर्गा पिळगाव, शांतादुर्गा डिचोली या देवतांच्या पालख्या क्रमाने आपापल्या स्थानावर विराजमान झाल्या होत्या. या पालख्यांचे भाविकांनी दर्शन घेत बैलपत्र व फुले वाहून सेवा रूजू केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दरवषीप्रमाणे नार्वेतील या उत्सवात खास उपस्थिती लावून नदीकिनारी शास्त्राsक्त पूजाअर्चा केली. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, मंडळ अध्यक्ष दयानंद कारबोटकर, प्रदेश महिला अध्यक्षा आरती बांदोडकर, नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर व इतरांची उपस्थिती होती.
नार्वे तीर्थ घाटाचा होणार आमदार निधीतून विकास – मुख्यमंत्री
राज्यातील एक पवित्र व प्रसिध्द जत्रा भरणारे हे स्थान असून या तीर्थ घाटाचा लवकरच सरकारकडून विकास होणार आहे. मोठ्या संख्येने भाविक या जत्रेत सहभागी होतात, त्यांची येथे गैरसोय होऊ नये यासाठी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी आमदार निधीतून या तीर्थ घाटाचा विटास व सुशोभुकरणाचा प्रस्ताव सादर केला, आहे. त्याला लवकरच मंजुरी देऊन काम सुरू करण्यात येणार आहे. येत्या किंवा त्यापुढील वषी या पवित्र स्थळाचा पूर्ण विकास पहायला मिळणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यातील हे एक प्रसिध्द आणि पवित्र स्थान असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवतांचा व स आहे. या स्थानाला ऐतिहासिक महत्त्व असून या गावातील विविध स्थळांचा विअआस करण्यासाठी सरकारदरबारी आपले प्रयत्न चालू असल्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.









