कुडाळ
गेले दोन-तीन दिवस तालुक्यात सर्वत्रच जोरदार पाऊस पडत आहे काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्याने कर्ली नदीला पूर आला आहे. कर्ली नदीचे पाणी कुडाळ शहरातील जून्या भंगसाळ पुलादरम्यान नदीपत्रातून बाहेर येऊन मुंबई -गोवा महामार्ग ते कुडाळ शहर या दरम्यानच्या मार्गावर हॉटेल गुलमोहर येथे रस्त्यावर आल्याने पोलिसांनी यादरम्यानची वाहतूक बंद केली आहे. कुडाळ तालुक्यात सर्वत्रच जोरदार प्रचंड पर्जन्यवृष्टी होत असून नदी नाले ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. सर्व वाहतूक पोलीस स्टेशन कुडाळ कॉलेज हॉटेल राज मार्गे वळविण्यात आली आहे.
माणगांव खोऱ्यात पूरस्थिती
दरम्यान माणगांव खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने कर्ली नदीला पूर आला आहे . दुकानवाड परिसरातील पूल पाण्याखाली गेल्याने त्या भागातील वाहतूक बंद आहे . शेतकरी शाळकरी मुलांची मोठी गैरसोय झाली आहे.









