नवी दिल्ली :
वॉलमार्ट यांच्या मालकीची इ-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट यांनी आगामी काळात भारतात हंगामी तत्वावर 1 लाख जणांना नोकरी देणार असल्याची घोषणा सोमवारी केली आहे. आगामी काळात उत्सवी हंगाम असल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरीक्त मनुष्यबळ लागणार असून यासंबंधीत नव्या उमेदवारांना कंपनीत लवकरच सामावून घेतले जाणार आहे. वितरण, पॅकेजिंग, प्रशिक्षण, मनुष्यबळ विकास, स्टोरेज अशा विभागांमध्ये उमेदवारांना काम करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे समजते. आगामी काळात कंपनी 19 लाख चौरसफुट एवढी जागाही घेणार आहे.









