सप्टेंबरमध्ये 4 टक्क्यांनी प्रवासी संख्या रोडावली
बेळगाव : बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये प्रवासी संख्या घटल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विमानांची संख्या वाढली असतानाही प्रवासी संख्या 4.89 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांमध्ये जागृती करणे गरजेचे आहे.ऑगस्ट महिन्यात बेळगावमधून 21 हजार 308 प्रवाशांनी प्रवास केला होता. सप्टेंबर महिन्यात मात्र 20 हजार 265 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. प्रवासी संख्या दिवसागणिक कमी होत असल्याने विमान कंपन्यांची चिंता वाढली आहे. कोरोनापूर्वी 35 हजार प्रवासी बेळगावमधून प्रवास करीत होते. सध्याची संख्या विचारात घेता प्रवासी बेळगावकडे पाठ फिरवत आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
दिल्ली, मुंबई शहरांना नियमित विमानफेरी सुरू
जानेवारी महिन्यात 16 हजार 637, फेब्रुवारी 16 हजार 352, मार्च 18 हजार 343, एप्रिल 18 हजार 922, मे 23 हजार 304, जून 21 हजार 582, जुलै 23 हजार 184, ऑगस्ट 21 हजार 308, सप्टेंबरमध्ये 20 हजार 265 प्रवाशांनी प्रवास केला आहे.









