विमानाच्या इंजिनात झाला होता बिघाड : चालक दलासह सर्व प्रवासी सुखरुप
वृत्तसंस्था/ मॉस्को
दिल्लीहून अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को येथे जात असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे मंगळवारी रशियाच्या मगदान येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. विमानाच्या इंजिनात झालेल्या बिघाडामुळे ते मगदानच्या दिशेने वळवावे लागल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.
6 जून रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट एआय-173 ने दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोसाठी उ•ाण केले होते. इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्यावर या विमानाला रशियाच्या मगदान विमातळावर सुरक्षितपणे लँड करविण्यात आल्याचे एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या विमानातील 216 प्रवासी आणि चालक दलाचे 16 सदस्य सुरक्षित आहेत. प्रवाशांना रशियातील विमानतळावर सर्व सुविधा उपलब्ध करविण्यात येत आहेत. प्रवाशांना सॅन फ्रान्सिस्को येथे पोहोचविण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात खराब हवामानामुळे चेन्नईहून सिंगापूर येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला मलेशियाच्या दिशेने डायवर्ट करण्यात आले हेते.