वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) दोन सदस्यीय तपासणी पथकाला एअर इंडियाच्या अंतर्गत सुरक्षा ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. डीजीसीए या प्रकरणाची चौकशी करत आहेत. डीजीसीएला सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालानुसार, एअर इंडिया एअरलाईनने केबिन सर्विलान्स, कार्गो आणि मालवाहतूक केंद्रांमध्ये नियमित सुरक्षा तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, 13 सुरक्षा बिंदूंच्या तपासणी न करता अहवाल दिल्याचे डीजीसीएच्या निदर्शनास आल्याने एअर इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
डीजीसीएच्या दोन सदस्यीय टीमने 25 आणि 26 जुलै रोजी हरियाणातील गुऊग्राम येथील एअर इंडियाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर अहवालातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. परंतु मुंबई, गोवा आणि दिल्ली स्थानकांवर अशाप्रकारे दुर्लक्षितपणा केला जात नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.









