प्रतिनिधी / बेळगाव
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महापालिका स्वच्छता कर्मचाऱयांनादेखील तिरंगा फडकविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
याकरिता महापालिकेच्यावतीने प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱयाला तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
महापालिका कार्यक्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱयांना हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना कालावधीत स्वच्छता कर्मचाऱयांनी दिलेले योगदान महत्त्वाचे असून ते कौतुकास्पद आहे. कोरोना कालावधीत सर्वच सरकारी कार्यालयातील कर्मचाऱयांनी चांगले काम केले आहे.
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त या सर्वांचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी पत्रकाद्वारे अभिनंदन केले आहे. तसेच हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने 1 हजार स्वच्छता कामगारांना तिरंगा ध्वज आणि ध्वजस्तंभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.









