आज अखेर ७३ उमेदवारी अर्ज दाखल
वाकरे / प्रतिनिधी
कुडीत्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी ५७ उमेदवारांनी ७१ अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवारअखेर ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार दि. ६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी २ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शनिवार, रविवारी निवडणूक कार्यालय सुट्टी असल्याने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गर्दी झाली होती.
सोमवारी ५०१ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. तसेच ५७ उमेदवारांनी दुबार अर्जासह ७१ उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे सोमवार अखेर ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यमान संचालक विलास पाटील (कोपार्डे), जयसिंग पाटील (ठाणेकर), माधुरी पाटील (खुपिरे) ,उत्तम वरुटे (कसबा बीड), माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, कुंभी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील (कुडित्रे) संचालक तानाजी पाटील (साबळेवाडी), प्रकाश उर्फ विलास देसाई (चिंचवडे), राजाराम शिंदे (माजगाव), दौलू संतु पाटील (आकुर्डे), के.डी.पाटील (खुपिरे), प्रा. टी.एल. पाटील, सुवर्णा पाटील, अनिश पाटील (कसबा ठाणे) या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून भगवान हराळे (खुपिरे) यांचा आज एकमेव अर्ज दाखल झाला.
सोमवारी गटवार दाखल झालेल्या अर्जांची संख्या
गट क्रमांक १ -१७
गट क्रमांक २- १४
गट क्रमांक ३ – ६
गट क्रमांक ४ – ६
गट क्रमांक ५ -१३
अनुसूचित जाती जमाती -२
महिला प्रवर्ग ९
इतर मागासवर्गीय गट ५
भटक्या व विमुक्त जाती जमात
भटक्या व विमुक्त जाती जमाती – १
दरम्यान विरोधी राजर्षी शाहू आघाडीचे उमेदवार एकत्रितरित्या मंगळवार दि.१० रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवार दि.१२ ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रचंड गर्दी होणार आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर हे काम पाहत असून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे हे काम पाहत आहेत.









