ऑनलाईन टीम / पुणे :
मुंबईसह लोणावळा-खंडाळा घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील रुळांवर पाणी साचलं आहे. परिणामी आज आणि उद्या पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या 5 रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये डेक्कन क्विन, सिंहगड एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी या ट्रेनचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
पुणे-मुंबई दरदरोजचा प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासह प्रवाशांना यह गैरसोयीला सामोरं जावं लागणार लागणार आहे.
आज (19 जुलै) रद्द झालेल्या रेल्वे गाडय़ा
पुणे-सीएसएमटी इंटरसीटी एक्स्प्रेस
पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस
सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
उद्याच्या (20 जुलै) रद्द झालेल्या रेल्वे गाडय़ा
पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
सीएसएमटी-पुणे इंटरसीटी एक्स्प्रेस
सीएसएमटी-पुणे डेक्कन एक्स्प्रेस
सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस








