ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कुपवाडामधील काला जंगलातून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा नापाक डाव सुरक्षा दलाच्या जवानांनी उधळून लावला. सुरक्षा दलाच्या गोळीबारात हे पाचही दहशतवादी मारले गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराला मिळाली होती. त्यानंतर दोन्ही यंत्रणांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. शोधमोहिम सुरू असतानाच कुपवाडामधील काला जंगलातून पाच दहशतवादी भारतीय हद्दीत प्रवेश करताना आढळले. त्यावेळी सुरक्षा दलांनी गोळीबार करत या पाचही जवानांचा खात्मा केला.
In a joint operation, Army and Police killed four terrorists in Kala Jungle of Machhal sector in Kupwara who were trying to infiltrate to our side from Pak-occupied Jammu & Kashmir (PoJK): Jammu and Kashmir police pic.twitter.com/64iTA2fBd3
— ANI (@ANI) June 23, 2023
जम्मू-काश्मीर आणि दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला भारतानं अनेकदा ठणकावलं आहे. पण पाकिस्तान काही सुधारायचं नाव घेत नाही. भारतीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न नेहमीच केला जातो. आजही पाक दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा खपयत्न झाला. तो सुरक्षा दलांनी उधळून लावला.