प्लास्टिक दुकानात भीषण आग : तीन मजल्यापर्यंत पेट
प्रतिनिधी/ बेंगळूर
प्लास्टिक मॅटसह विविध वस्तुंच्या दुकानात लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. बेंगळूरच्या हलसूर गेटजवळील नगर्तपेठ येथे शनिवारी पहाटे ही हृदयद्रावक घटना घडली. मृत कुटुंब हे मुळचे राजस्थानमधील असून मदन (वय 38), त्याची पत्नी संगीता (वय 33), मितेश (वय 8) आणि विहान (वय 5) अशी त्यांची नावे आहेत. तर दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सुरेशचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
नगर्तपेठ येथील संदीप व बालकृष्ण यांच्या मालकीच्या बहुमजली इमारतीच्या तळमजल्यातील प्लास्टिक चटईच्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. शनिवारी पहाटे 3:30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुरुवातीला तळमजल्यातील गोडवूनला आग लागली. त्यानंतर ती तिसऱ्या मजल्यापर्यंत व्यापली. इमारतीतील दोन मजले गोडावून होते. तेथे झोपी गेलेला कामगार सुरेश तसेच तिसऱ्या मजल्यावरील मदन व त्याचे कुटुंब अग्निदुर्घटनेत मृत्युमुखी पडले.
बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सिमंतकुमार सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आग लागताच इमारतीतील लोक बाहेर पडले. परंतु, एकाच कुटुंबातील चौघांसह पाचजण अडकून पडले. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना मंत्री जमीर अहमद खान यांनी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तज्ञ, बचाव पथकाने तातडीने बचावकार्य हाती घेतले. तातडीने रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाली. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्याने आत अडकून पडलेले पाचही जण









