संशयित आरोपी निपाणी, कोल्हापूरचे

वार्ताहर /हुबळी
हस्तीदंतापासून बनवलेल्या प्राचीन कलाकृतींची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या निपाणीच्या दोघांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 4 प्राचीन कलाकृती जप्त करण्यात आल्या आहेत. सीआयडी वन खात्याच्या पोलिसांनी हुबळी येथे ही कारवाई केली. विनायक कांबळे, दानजी पाटील (दोघेही रा. निपाणी), सात जमादार, विजय कुंभार आणि सागर पुराणिक (तिघेही रा. कोल्हापूर) अशी करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. हस्तीदंतापासून बनविलेल्या चार प्राचीन कलाकृतींची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सीआयडी वन विभागाचे डीवायएसपी मुत्तण्णा सवरगोळ यांच्या नेतृत्त्वाखाली सापळा रचून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सीआयडी वन विभागाच्या पोलिसांनी संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केले.









