पाकिस्तानी सुरक्षा दलाचे वाहन लक्ष्य
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानमधील बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने पाकिस्तानी सुरक्षा दलांना लक्ष्य करून मोठा हल्ला केला आहे. बलुचिस्तानच्या मांड भागात हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे पाच सैनिक ठार झाले, तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला माहिर आणि रुडिगच्या दरम्यान झाला. बीएलएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचा हल्ला इतका अचूक होता की पाकिस्तानी सुरक्षा दलांना प्रत्युत्तर देण्याची संधीही मिळाली नाही. अचानक झालेल्या या हल्ल्यात पाच सैनिक जागीच मृत्युमुखी पडले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांना लक्ष्य करत असे हल्ले वारंवार केले जात आहेत.









