मिरज :
कोल्हापूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघा इसमांना पकडून पाच किलो गांजा जप्त करण्यात आला. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली.
याप्रकरणी संदीप सर्जेराव पाटील (२८, रा. सुभाषनगर) आणि सिध्दाप्पा उर्फ सिध्दाण्णा माळी (रा. ख्वॉजा बस्ती झोपडपट्टी, मिरज) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गांजासह एक लाख, ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर रस्त्यावरील एक इसम गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा लावला होता. यावेळी संशयीत संदीप पाटील हा हातात पिशवी घेऊन थांबल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी करुन तपासणी केली. सदर पिशवीमध्ये पाच किलो, दोनशे ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला. त्याची किंमत एक लाख, ३० हजार रुपये इतकी होते. संदीप पाटील याने सदर गांजा हा सिध्दाप्पा माळी याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. त्यानुसार गांधी चौकी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. शहरात गांजाची तस्करी सर्रासपणे सुरू आहे








