बेळगाव : ब्रम्हदेव समुदाय भवन मजगाव येथे कराटे ब्लॅकबेल्ट परीक्षेत इंडियन कराटे क्लबच्या पाच कराटेपटूंनी उत्तीर्ण होऊन ब्लॅकबेल्ट मिळविला. या परीक्षेत एकूण 145 कराटेपटूने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून हैदर अली, उदय इडगल, सुनिता देसाई, बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविले. या स्पर्धेत मारुती नावगेकर, विराज लाड, आदित्य कडकोळ, चैतन्य कडकोळ, चिरंजीत प्रधान या स्पर्धेत ब्लॅकबेल्ट परीक्षात उत्तीर्ण झाले. कार्यक्रमासाठी इंडियन कराटे क्लबच्या महिला चीफ इंस्ट्रक्टर हेमलता काकतीकर, प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, निलेश गुरखा, हरिष सोनार, परशराम नेकनार, जयकुमार मिश्रा, सक्षम हंडे, वचना देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. या ब्लॅकबेल्ट खेळाडूना कराटे प्रशिक्षक विठ्ठल भोजगार आणि दिपिका भोजगार यांचे प्रशिक्षण लाभत आहे.
Previous Articleडंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
Next Article लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा रविवारपासून
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









