पर्वरी : येथील डेल्फीनो हायमार्ट सुपर मार्केट नजीक पार्क केलेल्या मालवाहू ट्रकवर कार आदळल्याने कारमधील चौघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दि.21 रोजी पर्वरी पोलीस स्थानकावर पणजी पोलीस संदेशवाहकांकडून पर्वरी येथील डेल्फीनो हायमार्ट सुपर मार्केटनजीक कारला अपघात झाला असून कारमधील चालकासह चौघे जखमी झाले असल्याचा संदेश आला. पर्वरी पोलीस स्थानकातील हवालदार आमिर वायंगणकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. डेल्फीनो हायमार्ट सुपरमार्केटनजीक रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रक क्र.टीएन -34,एम-0276 वर म्हापसा येथून पणजीला जाणा-या हुंडाई आयटेन कारने टक्कर मारली. या अपघातात जैसन वाज (27 कुट्ठाळी ), डीनीज वान्ग्रेस (29 नुवे), रोव्हलीन बार्जेस (30 नुवे ) मायरॉन बार्जेस (25 नुवे ) आणि ग्लॅम मार्टिन्स (28 वेळसाव ) हे पाच युवक जखमी झाले. जखमींपैकी मायरॉन बोर्जेस याला गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून इतर चौघे किरकोळ जखमी झाले आहेत.
Previous Articleगोंडस नावांच्या योजनांखाली सरकारचे घोटाळे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









