कॅलिफोर्नियात ‘ऑपरेशन बॅड बार्बी’अंतर्गत 23 जणांवर कारवाई
वृत्तसंस्था /जालंधर
अमेरिकेत मानवी तस्करी आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली 23 जणांना अटक करण्यात आली आहे. या 23 जणांमध्ये 5 भारतीय नागरिकांचाही समावेश असून ते मूळचे पंजाबमधील रहिवासी असल्याचे समजते. या कारवाईदरम्यान 3 पीडितांची सुटकाही करण्यात आली आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी कॅलिफोर्नियातील केर्न काउंटी येथे राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन बॅड बार्बी’ या विशेष अभियानादरम्यान ही कारवाई करण्यात आली. कॅलिफोर्नियामध्ये बेकर्सफील्ड कायदा अंमलबजावणी, युनायटेड स्टेट्स सिव्रेट सर्व्हिस, होमलँड सिक्मयुरिटी, फ्रेस्नो काउंटी इंटरनेट क्राईम्स अगेन्स्ट चिल्ड्रन टास्क फोर्स, एफबीआय, पॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि पॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ करेक्शन अँड रिहॅबिलिटेशन यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. धडक मोहिमेत एकूण 23 जणांना अमेरिकन पोलिसांनी अटक केली. पॅलिफोर्नियाच्या न्याय विभागाने तस्करीविरोधी कारवाईला ‘ऑपरेशन बॅड बार्बी’ असे नाव दिले आहे. या कारवाईचा भाग म्हणून पकडण्यात आलेले बहुतांश तऊण हे केर्न प्रांतातील आहेत.









