वृत्तसंस्था/ बँकॉक
येथे सुरू असलेल्या चौथ्या थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या पाच बॉक्सर्सनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुषांच्या विभागात जुगनूची (85 किलो) लढत कझाकच्या बेकझत तंगातारशी तर दीपकची (75 किलो) लढत दक्षिण कोरियाच्या किम ह्योऑन तेइ यांच्यात होईल. महिला विभागात तमन्नाची (51 किलो) उपांत्यपूर्व लढत चिनी तैपेईच्या लियु यु शानशी, प्रियाची (57 किलो) लढत द.कोरियाच्या पार्क आह ह्युनशी, अंजलीची (75 किलो) लढत जपानच्या नाओका कासाहाराशी होणार आहे.
भारताने या स्पर्धेसाठी 19 सदस्यांचे पथक पाठविले असून या स्पर्धेत चीन, कझाक, उझ्बेक, द.कोरिया व यजमान थायलंड यांनी बलाढ्या बॉक्सर्स उतरविले आहेत. मंगळवारी पाच भारतीय बॉक्सर्सचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. त्यात यासिका राय (48 किलो), आभा सिंग (54 किलो), पवन बर्तवाल (55 किलो), नोथोइ सिंग (50 किलो), ध्रुव सिंग (80 किलो) यांचा समावेश आहे.









