(भाग एक)
शरीर आणि पंचमहाभूते खरंतर आमच्या शरीराची जडणघडण या पंचतत्वातूनच झाली आहे. कबीरजींनी एका ठिकाणी याबद्दल फार सुंदर लिहून ठेवलेय. ‘बंगला खूप बनाया रे अंदर नारायण सोया पंचतत्व की भित बनाये बीच पवन का खंबा आवताजावत किसेन देखे मोही बडा अचंबा’.
आपलं शरीर म्हणजे पाण्याचा अंश, अग्नीचा अंश, वायूचा अंश. जडता म्हणजे पृथ्वीच आहे. अंश बुद्धी म्हणजे विचार पोकळीतून उमटणारा स्वर. म्हणून आकाशाची रचना एखाद्या बंगल्यासारखी. पंचमहाभूतांच्या भिंतींनी बनलेले हे शरीर वायूच्या नळीतून जाणारा वायू हा वायू नसून साक्षात भगवंत असतो. तो येता जाताना कोणाला दिसत नाही आणि म्हणूनच हे सगळे परमेश्वराचे अंशच आपल्यामध्ये असतात, असं आपण मानतो पण हे आत्मतत्त्व आम्हाला ओळखता मात्र येत नाही. ते कसं ओळखायचं हे आम्हाला योग साधनेने शिकवले. पाचही तत्त्वांची अनुभूती आम्हाला वेगवेगळ्या मार्गातून येत असते. आमच्या ज्या योगशास्त्रामध्ये सांगितलेली वेगवेगळी चक्रे आहेत त्यातून ही तत्व प्रकट होत असतात. विशुद्ध चक्र ह्यालाच आकाश चक्र किंवा आकाशतत्व असे म्हणतात. ज्यामध्ये मनाचा व्यापार चालतो. मुलाधार चक्र म्हणजे पृथ्वीतत्व, ज्याच्यामध्ये पेशी तयार होतात. स्वादिष्टांत चक्र हे जलतत्व आहे. विसर्ग आणि वेगवेगळे स्त्रावजातून निर्माण होतात. मणिपूर चक्र म्हणजेच अग्नितत्व जे अन्नपचनासाठी उपयोगाला येतात. अनाथ चक्र म्हणजे वायु तत्व जे श्वसनामुळे आपल्याला कायम चैतन्यमय ठेवत असतात. आकाश तत्वामध्ये वात किंवा पोकळी असं म्हणतात जी आमच्यामध्ये डोक्याच्या भागात, कानाच्या भागात, नाकाच्या भागात आणि मुखामध्ये जाणवते. वायू हा छाती म्हणजे श्वसनामार्फत चालू असतो. पोट म्हणजे पचनक्रिया जी अग्नी तत्व सांगते. मूत्राशय जलतत्व आणि पाय सगळा भार तोलतात म्हणून ते जडतत्व. पृथ्वीचे आम्ही नेहमी एक तत्व शिकत आलोय अति सर्वत्र वर्जते. हे जसं सगळ्या बाबतीत आम्हाला लागू होतं. तसं ह्या पंचमहाभूतांसाठीसुद्धा लागू पडतं. या उक्तीनुसार आमच्या शरीरात कोणत्याही भागात कोणत्याही तत्त्वाचा अतिरेक झाला तर तो इतर दुसऱ्या भागावर अतिक्रमण करतो आणि आमच्या शरीराचे स्वास्थ्य बिघडतं. आम्ही पैसा कमवतो त्यावेळी सुद्धा असं लक्षात येतं की अति पैसा झाला तरीही स्वास्थ्य बिघडतं आणि पैसाच नसला तरीही स्वास्थ्य बिघडतं. एकूण प्रत्येक गोष्ट अति झाली की आम्हाला त्रासदायक असते मग ते खाणं असेल, बोलणं असेल, वागणं असेल किंवा अति राग असेल, अति लोभ असेल या सगळ्यातूनच आम्हाला अति सर्वत्र वर्जते ही गोष्ट लक्षात ठेवायला लागते. मग अशा वेळेला अति झालेल्या गोष्टींसाठी त्याच्या विरुद्ध तत्त्वाची गोष्ट त्याच्यावर उपाय म्हणून वापरायला लागते जी आमच्या शरीराच्या बाबतीतसुद्धा उपयोगाला येते. आम्हाला जो त्रास होतो त्याच्या विरुद्ध तत्व वापरून आयुर्वेदाचे वैद्य आमच्यावरती उपाय करत असतात.








