कोल्हापूर :
नागाव (ता.हातकणंगले) येथे बिबट्याच्या पाच दिवसाच्या पिल्लाचा होरपळून मृत्यू झाला. ऊसतोड मजुरांनी ऊस तोडण्यासाठी मंगळवारी सायंकाळी फड पेटविला. त्यावेळी त्यांना पेटलेल्या उसातून बिबट्या पळताना दिसला.बुधवारी सकाळी ऊस तोडण्यास सुरुवात करण्यात आली असता काही वेळाने ऊसतोड मजुरांना बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
येथील अमित सोळांकुरे यांच्या उसाच्या शेतामध्ये बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. वन विभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी व पोलीस पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर बिबट्याच्या पिल्लाचे शवविच्छेदन करण्यात आले.
या घटनेमुळे बिबट्याच्या पिल्लाची आई आक्रमक होण्याची शक्यता वन विभाग व शेतक्रयांनी वर्तवली. मादी बिबट्या अन्य कोणावर हल्ला करणार नाही याची काळजी घेण्यासाठी वन विभागाच्या वतीने बुधवार आणि गुरुवार दोन दिवस या परिसरात ड्रोन कॅमेरा द्वारे निरीक्षण केले जाणार आहे.
बुधवारच्या या घटनेने नागाव परिसरात बिबट्या असल्याने गावात खळबळ माजली. शेतात निवांत ये जा करण्राया शेतक्रयांमध्ये सध्या चिंता निर्माण झाली आहे. कालपर्यंत उसाच्या बांधावर निवांत गप्पा मारत बसणारे शेतकरी आता काळजी करू लागले आहेत. स्वत?बरोबरच आपल्या जनावरांचीही काळजी शेतक्रयांना घ्यावी लागणार आहे. वनविभागाने लोकप्रतिनिधींच्या मार्फत शेतक्रयांना सूचना देण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये शेतक्रयांनी सायंकाळी एकट्याने शेतात ये जा करू नये. रात्रीच्या वेळी शेताकडे जाणे टाळावे. शेताला पाणी पाजणे हे रात्रीच्या वेळीच असल्याने सोबत कोणाला तरी घेऊन जावे. मोठा टॉर्च असावा,आणि मोबाईल वरती मोठ्या आवाजात गाणी लावून वन्य पणी आपल्यापर्यंत येणार नाहीत याची काळजी घ्यावी. असे वनाधिक्रायांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच सुधीर पाटील, अनिल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अभिनंदन सोळांकुरे, वनविभागाचे अधिकारी एम. एस. पोवार, विकास घोलप, अमोल चव्हाण, टोपच्या पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी कदम, पोलीस पाटील बाबासो पाटील उपस्थित होते.
नागावात बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाने बुधवारी शिक्कामोर्तब केले आहे.त्यामुळे वीज वितरण कंपनीने विद्युत पंपांचा विज पुरवठा राञपाळी ऐवजी दिवसपाळीत सुरू करावा अशी मागणी शेतक्रयांच्यातून होऊ लागली आहे.








