पोलिसांत फिर्याद दाखल
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या सुरूच आहेत. खानापूर रोड कॅम्प येथील एक क्लिनिक फोडून सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. गुरुवारी यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डॉ. सबास्टिन डिसोजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एक आठवड्यापासून खानापूर रोडवरील क्लिनिक बंद होते. याचवेळी कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे दागिने, 26 हजार रुपये रोखरक्कम, गिटार, किबोर्ड आदी सुमारे साडेपाच लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज पळविला आहे. हा प्रकार उघडकीस येताच डॉ. सबास्टिन यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. बंद क्लिनिकचा कडीकोयंडा तोडून दागिने, रोकड, गिटार, कीबोर्ड पळविणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.









