मुंबई :
रेटिंग एजन्सी फीच रेटिंग यांनी भारताचा विकास दर चालू आर्थिक वर्षामध्ये 6.3 टक्के राहणार असल्याचा नव्याने अंदाज व्यक्त केला आहे. याआधी कंपनीने हा अंदाज 6.4 टक्के इतका नोंदवला होता. अमेरिकेने अलीकडेच भारतावर जे शुल्क लादले गेले आहे त्याचा अंदाज घेत फीच रेटिंग संस्थेने नव्याने भारताच्या जीडीपी दरासंदर्भात माहिती जाहीर केली आहे. यानुसार चालू आर्थिक वर्षातील भारताचा जीडीपी दर 6.3 टक्के इतका राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एप्रिल महिन्यात फीचने भारताचा जीडीपी दर 6.4 टक्के इतका राहणार असल्याचे म्हटले होते. पण सध्याच्या अमेरिका आणि भारत यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर जीडीपी दरामध्ये अंदाजात घट केली आहे.









