मच्छिमार नेते बाबी जोगी यांचा प्रशासकीय कारभारावर संताप
मालवण : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग मालवण सागरी किनारपट्टी भागात परराज्यातील हायस्पीड बोटींचा धुमाकूळ सुरुच आहे. राज्याच्या जलधी क्षेत्रात हे हायस्पीड मोठया संख्येने घुसखोरी करत आहेत. मासळीची लूट करत करून स्थानिक मच्छिमारांनी समुद्रात टाकलेल्या मासेमारी जाळ्यावरून हे ट्रॉलर जात असल्याने जाळी तुटून जात आहेत. तसेच हे भलेमोठे हायस्पीड ट्रॉलर छोट्या बोटींच्या अंगावर येण्याचे प्रकारही घडत असून त्यामुळेही भीतीचे वातावरण आहे. मच्छिमार हवालदिल झाले आहेत. मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी प्रशासकीय कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मच्छिमारांना आपला लढा लढावा लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.









